Sangli Sahitya Sammelan : स्मशानभूमीत होणार आज शब्द पालवी साहित्य संमेलन

चिंचणीत अनोखा उपक्रम
 Marathi Sahitya Sammelan
Sahitya SammelanFile Photo
Published on
Updated on

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील स्मशानभूमीच्या शांत, निसर्गरम्य परिसरात रविवार, दि. 26 एप्रिलरोजी ‌‘शब्द पालवी साहित्य संमेलन‌’ हे आगळेवेगळे साहित्य संमेलन होणार आहे. “आपलं साहित्य, आपलं संमेलन” या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात असल्याची माहिती संयोजक प्रा. किशोर पाटील यांनी दिली.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याला साहित्याची आवड आहे, अशा प्रत्येकाला स्वतःचे किंवा आवडत्या कवी-लेखकांचे साहित्य मुक्तपणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्मशानभूमीच्या शांत वातावरणात शब्दांचा हा अनोखा उत्सव सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. येताना आपल्याला आवडेल तेवढे साहित्य सोबत घेऊन या, असे आवाहन आयोजक प्रा. किशोर पाटील यांनी केले आहे. संमेलनाला प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news