Sangli bank fraud: युनियन बँकेचे कर्ज घेऊन ३ कोटींचा अपहार

दोघांवर गुन्हा : कारखाना उभारण्यासाठी घेतले होते कर्ज
Bank Fraud
Bank FraudPudhari News Network
Published on
Updated on

सांगली : अंकली (ता. मिरज) येथील युनियन बँकेच्या शाखेतून मंजूर झालेल्या कर्जाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मशिनरीसाठी घेतलेली १ कोटींच्या कर्जाची रक्कम आणि त्यावरील २ कोटींचे खेळते भांडवल अशा एकूण ३ कोटी रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बँक शाखा व्यवस्थापक हेमंतकुमार यशवंतराव शिंदे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित रमेश विठ्ठल सूर्यवंशी (रा. हिंगणगादे, ता. खानापूर) आणि व्ही. बी. पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ३० जून २०१६ ते ७ एप्रिल २०२२ या सहा वर्षांच्या कालावधीत घडली आहे.

फिर्यादी हेमंतकुमार शिंदे हे अंकली येथील युनियन बँकेच्या शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संशयित रमेश सूर्यवंशी याने बँकेतून कारखान्यासाठी मशिनरी खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. यासोबतच ओव्हर ड्राफ्ट सुविधेअंतर्गत २ कोटी रुपयांचे खेळते भांडवलही वापरले.

मात्र, ही रक्कम ज्या कारणासाठी मंजूर झाली होती, तिथे न वापरता अन्य कारणांसाठी वळवून बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news