Umadi Accident : उमदीजवळ भीषण अपघातात एक ठार

सहा महिला जखमी; एक गंभीर; ट्रक-मोटारीची समोरासमोर धडक
Umadi Accident : उमदीजवळ भीषण अपघातात एक ठार
Published on
Updated on

जत शहर-वळसंग : मोटार आणि ट्रक यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका चालकाचा मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या. यापैकी एक महिला गंभीर जखमी असून तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविले आहे. जत तालुक्यातील उमदीजवळ अहिल्यानगर-पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी हा भीषण अपघात झाला.

पोलिसांनी सांगितले की, माडग्याळ येथील धानाप्पा मल्लाप्पा गुड्डापुरे (वय 44) हे आपल्या संख येथील नातेवाईकांसह मोटार (एमएच 12 जेसी 0339) मधून रविवारी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. उमदीपासून सुमारे दोन किलोमीटरवर अहिल्यानगर - पंढरपूर - विजयपूर राष्ट्रीय मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकची (एमएच 14 जेपी 5099) त्यांच्या मोटारीशी जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारीचे चालक धानाप्पा गुड्डापुरे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेस तत्काळ बोलावले. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या कुटुंबातील सहा महिला जखमी झाल्या असून त्यापैकी मृत धानाप्पा गुड्डापुरे यांची बहीण महादेवी हडपड (रा. संख) या गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे, तर इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news