Sangli Accident : उमदीतील अभियंत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

पुण्यातील घटना; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय ः आंबेगाव पोलिसात तक्रार
Sangli Accident
उमदीतील अभियंत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू
Published on
Updated on

जत शहर : उमदी (ता. जत) येथील सिव्हिल इंजिनियर असलेल्या जोतिराम राजाराम शेवाळे (वय 25) यांचा पुण्यातील एका इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. याबाबत रामचंद्र शेवाळे यांनी आंबेगाव, पुणे येथील पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

शेवाळे हे पुणे येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होते. तसेच मोशी, पुणे येथे राहत होते. पुणे येथील आंबेगाव पुणे या प्रकल्पाचे ठेकेदाराकडे ते सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होते. सोमवारी दुपारी ते फोन घेत नसल्यामुळे त्यांच्या चुलत भावाने पुणे येथील त्यांच्या मित्रांशी संपर्क साधला. मित्रांनी ते काम करत असलेल्या आंबेगाव परिसरातील एका इमारतीच्या बांधकामावर जाऊन पाहिले असता ग्राउंड प्लोअरमधून मोबाईलचा आवाज येत होता. तेथे जोतिराम बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

शेवाळे हे इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून पडून ग्राउंड फ्लोवरवरील डक्टमध्ये अडकून पडले होते. त्यांचे चुलत भाऊ रामचंद्र सदाशिव शेवाळे (रा. उमदी) यांनी ज्योतीराम यांचा अपघाती मृत्यू झाला नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आंबेगाव, पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news