Sangli News : सांगलीत हळदीस ३१,१०० रुपये उच्चांकी भाव!

वसंतदादा मार्केट यार्डमध्ये पार पडला हळदीचा सौद्या
turmeric
हळदPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्ड येथे शुक्रवारी झालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये हळदीस प्रति क्विंटल ३१,१०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.

मे. यशवंत ट्रेडर्स या दुकानातील सौद्यामध्ये बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी रवींद्र गोविंद पाटील यांच्या २० पोती हळदीला हा उच्चांकी दर मिळाला. वसंतदादा मार्केट यार्ड येथील मे. सूरज कॉर्पोरेशनचे मालक सूरज खोत यांनी या हळदीची खरेदी केली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही हळद या शेतीमालाच्या विक्रीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी वसंतदादा मार्केट यार्ड येथे जास्तीत जास्त आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती आनंदराव नलावडे यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांच्यासह खरेदीदार, व्यापारी, शेतकरी व हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news