

शिगाव; पुढारी वृत्तसेवा : शिगाव (ता. वाळवा) येथील लक्ष्मी मंदिरात असलेली लोखंडाची दानपेटी शनिवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शनिवारी दुपारी दोन अज्ञात तरूण मंदिराच्या गाभार्यात दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या खांद्याला मोठी कॅरिबॅग होती.
काही वेळाने ते तरूण बाहेर आले. थोड्या वेळाने मंदिराचे पुजारी दिलीप वसंत गावडे हे मंदिरात आले. तेव्हा त्यांना दानपेटी जागेवर दिसली नाही. गावडे यांनी याबाबत आष्टा पोलिसात तक्रार दिली आहे.