Sangli Theft : बसमधून शिक्षिकेचे 13 तोळे दागिने लंपास

प्रवासादरम्यान घटना ः पिशवी फाडून सोने पळवले
Jewellery Theft ST bus |
Jewellery Theft ST bus | File Photo
Published on
Updated on

सांगली : ईश्वरपूर ते सांगली बसने प्रवास करत असताना एका शिक्षिकेच्या पिशवीतून सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. याप्रकरणी नूतन बाबासाहेब आळतेकर (वय 44, रा. माळी गल्ली, मिरज) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिरज हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या नूतन आळतेकर या भाजपाचे पदाधिकारी बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी आहेत. त्या 11 मे रोजी एका लग्नासाठी पतीसोबत ईश्वरपूर येथे गेल्या होत्या. त्यांनी आपले 13 तोळे दागिने एका पिशवीत ठेवले होते. 13 मे रोजी लग्नसोहळा आटोपल्यानंतर त्या वडील, मुलगा आणि पतीसह ईश्वरपूर बस स्थानकावरून सांगलीच्या बसमध्ये (क्र. एमएच 14 बीटी 3069) बसल्या. गर्दी असल्याने सुरुवातीला त्यांना उभे राहून प्रवास करावा लागला. आष्टा येथे त्यांना बसमध्ये जागा मिळाली. सायंकाळी 7.30 च्या सुमारास बस सांगली बस स्थानकावर पोहोचली. बसमधून उतरत असताना त्यांना आपली पिशवी कोणीतरी ओढल्याचे लक्षात आले. पिशवी तपासली असता, ती वरून फाडलेली दिसली. त्यातील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरट्याने पिशवीतून 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत 4 लाख रुपये), 30 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार (1 लाख 50 हजार रुपये) आणि 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील साखळी असलेले झुबे (1 लाख रुपये) असा 6 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला. त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news