Sangli Accident : विसापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत कापड व्यापाऱ्याचा मृत्यू

ताकारी कालव्याजवळील घटना
Sangli Accident News
विसापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत कापड व्यापाऱ्याचा मृत्यू
Published on
Updated on

निंबळक : विसापूर (ता. तासगाव) येथील कापड व्यापारी युवराज ईश्वर जाधव (वय 53) यांचा अनोळखी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 22 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विसापूर-गोटेवाडी मार्गावरील ताकारी कालव्याजवळ घडली. घटनेची नोंद तासगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विसापूर येथील कापड व्यापारी युवराज जाधव हे तासगाव ते गोटेवाडी मार्गावरील 14 वा मैल या भागातून सकाळी आपल्या शेताकडे दुचाकीवरून निघाले होते. ताकारी कालव्याजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जाधव यांच्या डोक्याला, पायाला व छातीला जोरदार मार लागला. अपघात झाला तेव्हा मोठा आवाज झाल्याने जवळच असलेल्या दुकानामधील कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावून आले. त्यांनी जाधव यांना जखमी अवस्थेत तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

प्रतिकूल स्थितीत उभारला व्यवसाय

युवराज जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपला कापड व्यवसाय उभा केला होता. गावोगावी जाऊन कपडे विकत त्यांनी व्यवसायात नाव कमावले होते. व्यवसायासोबतच त्यांना भजन आणि कीर्तनाची आवड होती. त्यांच्या अपघाती निधनामुळे विसापूर परिसरासह व्यापारी वर्गात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news