Sangli Lightning Strike : सावर्डे येथे अंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू

तासगाव पोलिसात घटनेची नोंद
Lightning Strike
सावर्डे येथे अंगावर वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
Published on
Updated on

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव ) येथे वीज अंगावर कोसळून एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित उत्तम मंडले (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. ढगांचा गडगडाट सुरू होता. अशा स्थितीत रोहित हा त्याच्या घरासमोरील अंगणात उभा होता. त्याचवेळी आकाशात मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट होऊन अंगणात उभ्या असलेल्या रोहित याच्या अंगावर वीज कोसळली. क्षणार्धात रोहित जमिनीवर कोसळला. विजेच्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला.

नातेवाईकांनी व स्थानिकांनी बेशुद्धावस्थेत त्याला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news