Sangli Accident : सावर्डेत द्राक्षे भरलेल्या कंटेनर द्राक्षबागेवर पलटी झाला

द्राक्षबागेच नुकसान; चालक जखमी
Sangli Accident News
सावर्डेत द्राक्षे भरलेल्या कंटेनर द्राक्षबागेवर पलटी झाला
Published on
Updated on

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे द्राक्षे घेऊन चाललेला कंन्टेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या द्राक्ष बागेवर पलटी झाल्याने द्राक्षबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

सावळज येथील एका शीतगृहातील द्राक्षे भरून विक्रीसाठी घेऊन चाललेला कंन्टेनर ( एम एच 43 बी. पी. 5949) चालला होता. अपघातग्रस्त कंटेनर हा सावर्डे येथे तासगावकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंन्टेनर हा रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या संजय शिवाजी माने याच्या द्राक्षबागेत पलटी झाला. माने यांची द्राक्षबाग काढणीस आली आहे. परिपक्वझालेल्या द्राक्षबागेतील वेलीवर कंटेनर पडल्याने द्राक्षबागेच्या वेली मोडून पडल्या, तर काढणीस आलेल्या द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. शिवाय कंटेनरमध्ये असणाऱ्या द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती सावर्डेचे पोलिस पाटील सुरेश खराडे यांनी तासगाव पोलिसात दिली असता अंमलदार शिवाजी मंडले हे त्यांच्या साथीदारासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालक (नाव समजू शकले नाही) याला तातडीने उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news