Sangli News : तासगाव न्यायालय आवारात सहा संशयित घातक हत्यारांसह जेरबंद

दोन अल्पवयीन; अटकेतील संशयितांचा नेहरूनगर हल्ल्यात सहभाग
Sangli Crime News
तासगाव न्यायालय आवारात सहा संशयित घातक हत्यारांसह जेरबंदFile Photo
Published on
Updated on

तासगाव ः दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर-तासगाव येथे घरावर झालेला हल्ला व तोडफोडप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. या चौघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. यावेळी घातक शस्त्रांसह न्यायालयाच्या आवारात आलेले अन्य सहा संशयितही पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या विरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.

ऋषिराज प्रवीण झोरे, हनुमंत दिगंबर गायकवाड, अरमान हजरतअली कवठेकर व सैफ जमीर जमादार (सर्व रा. संजयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील दोघा अल्पवयीनांना नोटीस देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर-तासगाव येथील सागर प्रकाश ढाणे यांच्या घरावर रात्री अकरा वाजता बारा जणांनी हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये एक मोटार, दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली होती. हल्लेखोरांनी ढाणे यांच्या घराचा मुख्य दरवाजा कुऱ्हाडीने घाव घालून तोडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या बारा जणांपैकी चौघांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चार संशयितांना मंगळवारी न्यायालयात तासगाव न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पोलिसांचे पथक संशयितांना घेऊन न्यायालयात येत असताना अन्य सहा संशयितही न्यायालयाच्या आवारात येऊन थांबले. त्यांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल टकले यांना दिली. टकले यांच्या सूचनेवरून पोलिस अंमलदार विवेक यादव, अमर सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, सुरेश भोसले, सूरज जगदाळे, पवन जाधव याचे पथक तत्काळ न्यायालयाच्या आवारात पोहोचले. पथकाने या सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता प्रत्येकाच्या कमरेला एडका व चाकू अशी घातक शस्त्रे मिळाली. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस शिपाई विवेक यादव यांनी फिर्याद दिली आहे. सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलम 188(2), 189(4), 190 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अन्वये तासगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news