सांगली : कर्नाळच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचतपतच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यावर नोंदीसाठी ५० हजाराची मागणी
Sangli bribery case
कर्नाळ येथील तलाठ्यासह दोघांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली. File Photo
Published on
Updated on

सांगली : एक गुंठा शेत जमिनीची सात बारा उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कर्नाळ (ता. मिरज) येथील तलाठ्यासह दोघांना गुरूवारी (दि.२०) अटक करण्यात आली. तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (वय ४९, रा. फ्लॅट न. ५, हिरा अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग) व एजंट गणेश विश्वास कांबळे (वय ३०,रा. पद्माळे, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी कर्नाळ येथे एक गुंठा शेतजमीन खरेदी केली होती. त्याची सात बारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी फराकटे यांची भेट घेतली. तेव्हा फराकटे याने ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २८ जानेवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ व ३० जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तलाठी फराकटे यांचे पंचाच्या समक्ष ५० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी तलाठी फराकटे यांनी तडजोडीअंती ४० हजार रूपये लाचेची मागणी करून एजंट गणेश कांबळे याला जाऊन भेटण्यास सांगितले.

एजंट कांबळे यानेही तक्रारदार यांच्या कामासाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली. रक्कम कमी करण्याची विनंती केली असता त्याने तलाठी फराकटे यांना भेटण्यास सांगून लाच देण्यास प्रोत्साहन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नसली तरी ती मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news