Sangli Stray Dog Attack: सांगलीत भटक्या कुत्र्यांनी बालकाचे लचके तोडले

विजयनगर-सैनिकनगर परिसरातील घटना; मोठ्या भावाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव
Stray Dog
Stray DogPudhari
Published on
Updated on

सांगली : शहरातील विजयनगर-सैनिकनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी रस्त्याकडेला खेळत असलेल्या अडीच वर्षांच्या बालकावर हल्ला करून अक्षरशः त्याचे लचके तोडले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. जोथाम प्रवीण भोरे असे जखमी बालकाचे नाव आहे. त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोठ्या भावाने प्रसंगावधान राखत धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी केडीसी चर्च परिसरात जोथाम घराजवळ खेळत होता. यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कुत्र्यांनी बालकाच्या हाताला आणि शरीराच्या इतर भागांना चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.

बालकाची आरडाओरड ऐकून कुटुंबीय आणि शेजारी घटनास्थळी धावले. यावेळी त्याच्या मोठ्या भावाने धैर्य दाखवत कुत्र्यांना दूर हुसकावून लावले. त्यामुळे बालकाचा जीव वाचला. जखमी चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून आवश्यक लसीकरण केले आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि लहान बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news