Sangli SSC Result 2026: दहावीचा निकाल 93.56 टक्के

गतवर्षीच्या तुलनेत टक्का घसरला : उत्तीर्णांमध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर
Sangli SSC Result 2026: दहावीचा निकाल 93.56 टक्के
Published on
Updated on

सांगली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 93.56 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2.53 टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्ये मुलींची टक्केवारी 96.65 आहे. कोल्हापूर विभागात जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकाविला.

केवळ 2,476 विद्यार्थी अनुत्तीर्ण

जिल्ह्यात माध्यमिकच्या 701 शाळा आहेत. या शाळांतील 38 हजार 775 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला होता. त्यापैकी 38 हजार 493 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 36 हजार 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ 2 हजार 476 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news