Sangli Solar Panel Fraud: सोलर पॅनेलच्या नावाखाली आठ लाखांची फसवणूक

सांगलीतील व्यापाऱ्यास गंडा; मुंबईतील कंपनीवर गुन्हा
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

​सांगली: सोलर पीव्ही मॉड्युल्सचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून कॉलेज कॉर्नर परिसरातील एका व्यापाऱ्याची ८ लाख ८ हजार १६४ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात मुंबईतील कंपनीसह एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

केशव लक्ष्मीकांत सारडा ( २३, रा. अंबाईनगर, कॉलेज कॉर्नर, सांगली) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यावरून ध्रुव अग्रवाल आणि सनरूट एनर्जी सोल्यूशन कंपनी (युरेका टॉवर, मालाड वेस्ट, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ​संशयित ध्रुव अग्रवाल याने सारडा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सनरूट एनर्जी सोल्यूशन कंपनीच्या ‘सोलर मॉड्युल्स’बाबत माहिती दिली.

त्यांचा विश्वास संपादन करून १६ लाख १६ हजार ३२८ रुपयांच्या मालाची ऑर्डर स्वीकारली. या कामासाठी फिर्यादीकडून ऑनलाईन ८ लाख ८ हजार १६४ रुपये खात्यावर वर्ग करून घेतले. रक्कम मिळूनही ऑर्डर केलेला माल न पाठवता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news