Sangli DJ News : सहा मंडळे, ४० वर पदाधिकाऱ्यांसह डीजे मालक, चालकांवर गुन्हे दाखल

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
DJ Sound System
DJ Sound System
Published on: 
Updated on: 

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाने दिलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टिम वाजवणाऱ्यांवर सांगली ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मानवी आरोग्यास व सुरक्षिततेस धोका निर्माण करून सार्वजनिक उपद्रव केल्याप्रकरणी समडोळी, नांद्रे, कावजी खोतवाडी, इनामधामणी आणि कसबे डिग्रज येथील ६ मंडळांचे पदाधिकारी, डीजे मालक व चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आवाज कमी करण्याचे निर्देश देऊनही दुर्लक्ष केल्याने पोलीस कॉन्स्टेबल मनोज वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून जय हो ग्रुप, समडोळी (शांती सागर चौक) या मंडळाचे अध्यक्ष नरसू नेमाण्णा चव्हाण, उपाध्यक्ष संतोष बाळासाहेब पाटील, पदाधिकारी प्रशांत देसाई, देवाप्पा देसाई, शीतल कोळी, ट्रॅक्टर चालक किरण राजोबा, डीजे मालक अभिजित जाधव (रा. सैदापूर, सातारा) आणि ऑपरेटर ओंकार अडगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना डीजे लावून गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन कोळी यांच्या तक्रारीवरून वाल्मीकी चौक गणेशोत्सव मंडळ, समडोळी (स्टँड चौक) या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद दिलीप कोळी, उपाध्यक्ष साहील शफिक फकीर, पदाधिकारी नितेश मस्कर, तुषार कोळी, ट्रॅक्टर चालक अभिजित गवंडी, डीजे मालक समीर नासीर मुल्ला (रा. आंधळी) आणि ऑपरेटर ऋषिकेश कोळी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

नांद्रे (मिरज) येथे ट्रॅक्टर व विनानंबर ट्रॉलीवर डीजे लावून त्रास दिल्याप्रकरणी पोलिस हवालदार अक्षयकुमार माने यांच्या तक्रारीवरून अध्यक्ष बसवराज सदाशिव मसुडगी, उपाध्यक्ष मल्लीकार्जुन सावळगी, पदाधिकारी शिवराज मसुडगी, काशिनाथ इडी, मनू यळगुती, प्रशांत बंडगर, सागर दळवाई आणि उमेश मदने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कावजी खोतवाडी (मिरज) येथे टेम्पोवर डीजे लावून मोठा आवाज केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज हणमंतराव पाटील, उपाध्यक्ष ओंकार निकम, पदाधिकारी प्रणव पाटील, चालक प्रवीण कांबळे व ऑपरेटर रोहन कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. इनामधामणी (मिरज) येथे ट्रॅक्टरवर डीजे लावून उपद्रव केल्याप्रकरणी श्रमण आदिनाथ मगदूम, सुशांत सुंदर भोसले, शुभम आगळगावे, अविष्कार कांबळे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबे डिग्रज (मिरज) येथे ट्रॅक्टरवर 'वी ऑडिओ कराड' नावाचा डीजे वाजवल्याप्रकरणी कृष्णकांत सायमोते, शुभम शेवाळे, ओंकार साठे, स्वप्निल मगदूम, डीजे मालक अभय मंडले आणि चालक प्रवीण कदम यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news