Sangli News : शिवपुरी परिसरात गौण खनिज उत्खनन

चालकांची मनमानी : जीवमुठीत घेऊन प्रवाशांचा प्रवास
Shivpuri Mining News
शिवपुरी : इस्लामपूरदरम्यान डंपर चालकांच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर अशी खडी पडली आहे.
Published on
Updated on

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील शिवपुरी- इस्लामपूर रस्त्यावर खडी व मुरमाचा ठिकठिकाणी थर साचत आहे. त्यामुळे दोन चाकी व चार चाकी वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने गौण खनिज उत्खनन जोमात सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

गौण खनिज उत्खननामुळे प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

अनेक डंपर चालकांच्या निष्काळजीपणामुळे डंपर व टिप्परमधून होणारी मालाची गळती व धूळफेक ही वाटसरूंसाठी जीवघेणी आणि घातक ठरत आहे. परिसरात असलेल्या दगड खाणींमधून रोज इस्लामपूर व शिराळा तालुक्यातील बांधकामासाठी असंख्य ब्रास खडी पुरविली जाते. ती वाहून नेण्यासाठी अनेकांनी मोठ्या क्षमतेचे डंपर व टिपर्स खरेदी केलेत. तर काही जुनाट व खिळखिळ्या झालेल्या वाहनांचाही यासाठी वापर केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news