Sangli crime : शिवरवाडीत विवाहितेवर चाकूने खुनी हल्ला

संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताचे कृत्य
Sangli Crime  News |
शिवरवाडीत विवाहितेवर चाकूने खुनी हल्ला File Photo
Published on
Updated on

शिराळा : शिवरवाडी (ता. शिराळा) येथे संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून एका 26 वर्षीय विवाहितेवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवार, दि. 17 एप्रिलरोजी सकाळी साडेअकरा वाजता येथील टेकाची वाट परिसरात घडली. याप्रकरणी शंकर श्रीपती बेंद्रे (रा. शिवरवाडी) याच्यावर शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कचरा टाकण्यासाठी बाहेर गेली असताना संशयित शंकर बेंद्रे याने तिला गाठले. संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने पीडित महिलेवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर जखमी महिलेला तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी ईश्वरपूर येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शंकर बेंद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार वैभव पाटील अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news