Sangli Crime : शिराळा पश्चिम भागात चोऱ्यांचे वाढते सत्र

घरफोड्या, शेतीपंप, विद्युत तारा निशाण्यावर
theft
theftPudhari
Published on: 
Updated on: 

कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात घरफोड्या आणि चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे, दुकाने, शेतातील पाण्याचे पंप आणि विद्युत तारा चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने ग्रामस्थांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

घरफोड्या, शेतीपंपांच्या चोऱ्यांत वाढ

कोकरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गम आणि डोंगराळ गावांमध्ये चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी बंद असलेली घरे, दुकाने तसेच शेतातील विद्युत पंपांना लक्ष्य केले जात आहे. घरांतील दागिने व रोकड, शेतीपंप, विद्युत तारा आणि दुकानांतील साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थ व शेतकरी हैराण झाले आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्यही सुरक्षित नसल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

पश्चिम भागातील दुर्गम गावांमध्ये रात्रीच्यावेळी प्रभावी पोलिस गस्त होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त घालणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे व चोरीच्या घटनांनंतर तातडीने तपास सुरू करणे आवश्यक आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांना स्वतःच रात्री जागून पहारा देण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे. शेतीकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

सिग्नल रोज सुरू ठेवण्याची मागणी

सांगली : शहरातील सिग्नल अनेकदा बंद असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा सिग्नल सुरू नसल्याने दुचाकीस्वार गतीने कसेही घुसतात. जिथे चार रस्ते एकत्र येतात, तिथे सिग्नल बसवलेले आहेत. मात्र ते बंद असले की चारी बाजूची वाहने चौकात एकत्र येतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडतात. अशावेळी वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न करत असले तरी, चारी बाजूची वाहतूक नियंत्रित करताना कसरत करावी लागते. सिग्नल यंत्रणा नियमित सुस्थितीत सुरू राहावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. वाहनचालकांना बऱ्याचदा जायचे असते एका दिशेला आणि वाहन चालवतात दुसऱ्या दिशेने. त्यामुळे सिग्नल बंद असतील तर वाहतुकीस अडथळे आणले जातात. त्यामुळे चौका-चौकातील सिग्नल सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत तरी सुरू ठेवण्यात यावेत. त्याच वेळी अधिक वर्दळ असते. अनेकदा सकाळच्यावेळी सिग्नल सुरू नसतात. त्यामुळे अनेकांची गैरसोय होते. ते नेहमी सुरू ठेवण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news