Sangli News : शिराळ्यात 37 पाणी जोडण्या तोडल्या

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपंचायतीची विशेष मोहीम
Sangli News
शिराळ्यात 37 पाणी जोडण्या तोडल्या
Published on
Updated on

शिराळा शहर : शिराळा नगरपंचायतीतर्फे घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी दिली.

ते म्हणाले, नगरपंचायतीच्या नोंदीनुसार शहरात काही नागरिकांकडे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित आहे. विशेषतः काही थकबाकीदारांकडे तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची थकबाकी असून, वारंवार नोटीस व सूचना देऊनही संबंधितांकडून थकबाकीची रक्कम भरली जात नाही. यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. शहरामध्ये सुमारे 100 ते 125 नागरिक असे आहेत की, ज्यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी रुपये 15000 पेक्षा जास्त आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकीची रक्कम न भरल्यामुळे संबंधित थकबाकीदारांच्या नळ जोडण्या तोडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news