Sangli News : गिरजवडेत अडकलेल्या खवले मांजराची सुटका

नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
Sangli News
गिरजवडेत अडकलेल्या खवले मांजराची सुटका
Published on
Updated on

शिराळा शहर : गिरजवडे (ता. शिराळा) येथील जंगल कक्ष क्रमांक 41 च्या वन हद्दीला लागून असलेल्या एका उसाच्या फडात दुर्मीळ खवले मांजर आढळले. शेड नेटमध्ये अडकलेल्या या वन्यप्राण्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडले.

गिरजवडे येथील शेतकरी शिवाजी बाबुराव शेळके यांनी आपल्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती शेडनेट लावले होते. शनिवारी सकाळी या नेटमध्ये एक खवले मांजर अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती गणेश मुळीक यांना दिली, त्यानंतर वन विभागाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक स्वाती कोकरे, वनपाल अनिल वाजे, सह्याद्री वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड, दादा शेटके आणि आदिक शेटके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अडकलेल्या खवले मांजराला अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सातव व अनिल पारधी यांनी या प्राण्याची वैद्यकीय तपासणी केली. खवले मांजर पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि सुशीलकुमार गायकवाड यांनी या खवले मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news