Sangli News : नागपंचमी उत्सवासाठी शिराळानगरी सज्ज

यात्रेकरूंसाठी सर्व सोयी-सुविधांची तयारी
Sangli News
नागपंचमी उत्सवासाठी शिराळानगरी सज्ज
Published on
Updated on

शिराळा : येथे सोमवारी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीची सर्व स्तरांवर जय्यत तयारी झाली आहे. शिराळा नगरपंचायत, वनखाते, आरोग्य विभाग, महसूल व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी ६१७ पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १५ व्हिडीओ कॅमेरे, १२ ध्वनिमापक यंत्रे, दोन दंगल नियंत्रण पथके आदींचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, अंबामाता मंदिर परिसर व मिरवणूक मार्गावर २० सीसीटीव्ही कॅमेरे, चार वॉचटॉवर उभारण्यात आले आहेत. १६ व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, सर्पदंशावरील प्रतिबंधक ६०० लसी उपलब्ध आहेत. उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरसह अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. फिरती वैद्यकीय पथके ३२ असून, शहरात सात आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. एसटी बसस्थानक, व्यापारी हॉल, पाडळी नाका, लक्ष्मी चौक, शनिमंदिर, समाजमंदिर, नायकुडपुरा आदी सात ठिकाणी आरोग्य पथके असतील. तीन रुग्णवाहिकाही उपलब्ध आहेत.

नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, पंचायत समिती सभापती सम्राटसिंग नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, बांधकाम सभापती राजसिंह पाटील, मुख्याधिकारी सूरज कांबळे, वीज वितरणचे उपअभियंता हेमंत येडगे यात्रेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

शिराळा शहरास जोडणाऱ्या रस्त्यांच्या देखभालीचे काम उपअभियंता वैभव जाधव व शाखा अभियंता संदीप मिसाळ यांनी केले आहे. वन विभागाचे शिराळा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची, तसेच १० गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांमध्ये २८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सात ठिकाणी तपासणी नाके आहेत. शिराळा आगाराच्या ३५, तर बाहेरील आगारांच्या ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपंचमी उत्सवादरम्यान यंत्रणांनी सर्व विभागांचा आढावा घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news