Sangli Robbery : शेगाव येथे वृद्धाचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लंपास

जत पोलिसात दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
Robbery
RobberyPudhari
Published on: 
Updated on: 

जत : शेगाव (ता. जत) येथे पेरूच्या बागेजवळ दोन चोरट्यांनी ६९ वर्षीय वृद्धाला अडवून त्यांच्या अंगावरील सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी दोन जत पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सयाप्पा ईश्वरा ओलेकर (वय ६९, रा. रेवनाळ, ता. जत) असे वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाप्पा ओलेकर हे ५ ऑक्टोबररोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शेगाव येथील माजी आमदार कांबळे यांच्या घरामागील पेरूच्या बागेजवळ गेले होते. या वेळी पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ओलेकर यांना गाठले आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन तेथून पळ काढला.

चोरट्यांनी १ तोळा वजनाचे सोन्याचे बदाम व दोन पेट्या असलेला दागिना तसेच २.५ ग्रॅम वजनाची कानातील हुडकी असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद ७ ऑक्टोबर रोजी जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news