Sangli Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेचौदा लाखांचा गंडा

कुंडलच्या एकाची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
Sangli Cyber Crime
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेचौदा लाखांचा गंडाPudhari File Photo
Published on
Updated on

कुंडल ः शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करून त्यातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुंडल येथील एका व्यक्तीची 14 लाख 60 हजार 355 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी किरण रावसाहेब सांजने (वय 39, रा. कारखाना कॉलनी, कुंडल, मूळ रा. उगार बु., जि. बेळगाव) यांनी कुंडल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरण सांजने हे कुंडल येथील एका कारखान्यात नोकरीस आहेत. आपल्या मोबाईलवरून शेअर मार्केटची माहिती घेत असताना, त्यांना ब्लॉक ट्रेडिंगशी संबंधित मेसेज आला. त्यानंतर त्यांना एसबीआय सिक्युरिटी ॲडव्हान्स ब्रोकर नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपची एजंट स्मिता भगत हिने विविध मोबाईल क्रमांकांवरून इंटरनेटच्या माध्यमातून सांजने यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. 16 ऑक्टोबर 2025 ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सांजने यांनी वेळोवेळी एकूण 14 लाख 60 हजार 355 रुपये संबंधितांनी सांगितलेल्या खात्यांवर जमा केले. त्यानंतर संशयित आरोपीने पुन्हा 8 लाख रुपये मॅनेजमेंट फी म्हणून भरण्याची मागणी केली. यावेळी आपली फसवणूक होत असल्याची शंका आल्याने सांजने यांनी पैसे भरण्यास नकार दिला आणि आपली जुनी रक्कम परत मागितली. मात्र, समोरून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणातील व्यवहारांसाठी 9624042069, 7203828424, 9736715838, 9925574663 आणि 8680966481 या क्रमांकांचा वापर करण्यात आला आहे. कुंडल पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, सायबर सेलच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news