Sangli-Satara elections: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी १२ मतदान केंद्रे

सातारा जिल्ह्यात ७, तर सांगली जिल्ह्यात ५ केंद्रांचा समावेश
election
election file photo
Published on
Updated on

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या चारने वाढवण्यात आली आहे. निवडणुकीसाठी १२ केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यामध्ये सातारा जिल्ह्यात ७, तर सांगली जिल्ह्यात ५ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

एकूण मतदार संख्या ८९५ असून, यामध्ये पुरुष ४४३, तर महिला मतदारांची संख्या ४५२ आहे. सांगली जिल्ह्यातील मतदार संख्या ४२३, तर सातारा जिल्ह्यातील मतदार संख्या ४७२ आहे. सातारा जिल्ह्यात सात मतदान केंद्रे आहेत. यामध्ये नगरपरिषद वाई, नगरपरिषद महाबळेश्वर, नगरपरिषद पाचगणी, नगरपंचायत खंडाळा, नगरपंचायत फलटण, नगरपंचायत दहिवडी, नगरपंचायत वडूज, नगरपरिषद म्हसवड, नगरपंचायत कोरेगाव, नगरपरिषद रहिमतपूर, जिल्हा परिषद सातारा, नगरपरिषद सातारा, नगरपंचायत मेढा, नगरपंचायत पाटण, नगरपरिषद कराड, नगरपंचायत मलकापूर यांचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यात पाच मतदान केंद्रे आहेत. यामध्ये नगरपंचायत कडेगाव, नगरपंचायत पलूस, नगरपरिषद विटा, नगरपंचायत आटपाडी, नगरपरिषद तासगाव, नगरपरिषद आष्टा, नगरपरिषद उरुण-ईश्वरपूर, नगरपंचायत शिराळा, जिल्हा परिषद सांगली, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, नगरपरिषद जत, नगरपंचायत कवठेमहांकाळ यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news