Sangli car sale fraud: मोटार खरेदी-विक्री व्यवहारात साडेचार लाखांची फसवणूक

लक्ष्मी मंदिर चौक परिसरात मोटार खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एकाची 4 लाख 53 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली
fraud
fraud (Pudhari File Photo)
Published on
Updated on

सांगली : येथील लक्ष्मी मंदिर चौक परिसरात मोटार खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एकाची 4 लाख 53 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत फिर्यादी समीर दस्तगीर जमादार (रा. लक्ष्मी मंदिर, हडको कॉलनी, कुपवाड) यांनी संजयनगर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित सिकंदर रजाक कुरेशी खाटीक (रा. कुपवाड, सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, समीर जमादार यांनी संशयित कुरेशी खाटीक याच्याकडून त्याची मोटार (क्र. एमएच 10 डीजी 2786) घेतली होती. त्याबदल्यात जमादार यांनी खाटीक याला उसनवार रोख 5 लाख 50 हजार रुपये, गाडीचे प्रलंबित हप्ते व ऑनलाईन पेमेंटसह एकूण 10 लाख 68 हजार रुपये दिले होते.

नंतर ती गाडी विकून आलेली रक्कम 5 लाख 15 हजार रुपये फिर्यादी जमादार यांना परत मिळाले, मात्र उर्वरित 4 लाख 53 हजार रुपयांची रक्कम वारंवार मागणी करूनही सिकंदर खाटीक याने दिली नाही. पैशांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस संशयित खाटीक याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news