Sangli Accident : दोन दुचाकींच्या धडकेत पोलिसासह दोघांचा मृत्यू

तासगाव-भिवघाट रस्त्यावर भीषण अपघात
  Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

तासगाव : तासगाव-भिवघाट रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाचा समावेश आहे. मृतांमध्ये अमोल सुखदेव बुरुंगले (वय 31, रा. दहिवडी, ता. माण), वैभव सुरेश तोरवी (वय 21, रा. साईराम कॉलनी, कर्नाळ रोड, सांगली) यांचा समावेश आहे, तर वैभव यांच्यासोबत असलेले अर्जुन अशोक हातेकर (रा. कोसारी, ता. जत ) हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक महिती अशी, कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेले अमोल बुरुंगले हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच 14 ईजी 7939) तासगाववरून वायफळेकडे जात होते. याचवेळी आरवडेकडून तासगावच्या दिशेने वैभव तोरवी व अर्जुन हातेकर हे विनाक्रमांक दुचाकीवरून येत होते. भिवघाट रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ समोरच्या वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात वैभव यांच्या दुचाकीने अमोल यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघातात दोन्ही दुचाकींवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अमोल बुरुंगले आणि वैभव तोरवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. वैभव यांच्या दुचाकीवर मागे बसलेले अर्जुन हातेकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी याबाबत मृत अमोल बुरुंगले यांचे मेहुणे गणेश तानाजी इंगवले (रा. वायफळे, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मृत वैभव तोरवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news