Sangli Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

आटपाडी-शेटफळे रस्त्यावरील घटना
Sangli Accident News
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर
Published on
Updated on

आटपाडी : आटपाडी–शेटफळे रस्त्यावर लेंगरेवाडी पाटी येथे दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी (दि.१८) दुपारी एकच्या सुमारास घडली. निलेश रामा माने (वय २९) असे मृताचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लिंगीवरे येथील निंबाळकर वस्तीवरील निलेश रामा माने (वय २९ ) हा मित्र प्रशांत करडेसह आटपाडीवरून आरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होता. तर शेटफळे येथील ‘तु बु मळा’ शाळेतील प्राथमिक शिक्षक सागर सुपेकर हे शाळा सुटल्यानंतर आटपाडीकडे परत येत होते. लेंगरेवाडी पाटी येथे दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात निलेश माने व सागर सुपेकर हे गंभीर जखमी झाले, तर प्रशांत करडे लाही दुखापत झाली. जखमींना आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु निलेश माने या युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.तर सागर सुपेकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news