Sangli Crime: ‘आर. के. गँग’च्या आठजणांवर मोक्का

कृष्णाघाटावरील खुनाच्या गुन्ह्यात कारवाईस मंजुरी
MCOCA
MCOCAPudhari
Published on
Updated on

सांगली : कृष्णा घाटावर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात ‘आर. के. गँग’च्या आठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

कारवाई झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख राकेश शामराव कांबळे (वय ३१, रा. न्यू टिंबर एरिया, सांगली), लखन पंडित इसरडे (वय ३५), कृष्णा ऊर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे (वय २५), करण किशोर शिंदे (वय २७), महेश विजय नाटेकर (वय १९), सुनील ऊर्फ मुक्या निलाप्पा खडते (वय ३८) आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा (अल्पवयीन) समावेश आहे.

संशयितांनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून २०१६ पासून सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली होती. वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, प्राणघातक शस्त्रांचा वापर करून जबरी चोरी, बेकायदा देशी दारू विक्री आणि बेकायदा शस्त्रे बाळगून भीतीचे वातावरण निर्माण करणे, असे अनेक गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यामार्फत विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मोक्का मंजुरीचा अहवाल सादर केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक अरुण सुगांवकर व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news