सांगली : गैरकारभार कळवा, दहा हजार मिळवा

जिल्हा बँकेची बक्षीस योजना : कर्मचार्‍यांवर वॉच : ‘व्हिसल ब्लोअर’ धोरण लागू
Sangli District Central Bank
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
Published on
Updated on

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारात घोटाळे होऊ नयेत, होत असलेले घोटाळे वेळीच लक्षात यावेत, त्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी बँकेने आता ‘व्हिसल ब्लोअर’ धोरण लागू केले आहे. याअंतर्गत बँकेतील गैरकारभाराची माहिती कळवल्यास संबंधिताला एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. माहिती देणार्‍याचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

जिल्हा बँकेत अलीकडे कर्मचार्‍यांकडून झालेल्या गैरकारभाराच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. यात या शासनाच्या अनुदानापासून ते खातेदारांच्या पैशावर डल्ला मारल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकणी बँकेने तत्काळ कारवाई करत अपहाराची रक्कम वसूल केली. गैरकारभार करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई केली. बँकेत ठेवलेल्या सोने तारणातही यापूर्वी गैरकारभार झाल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍यांवर, त्यांच्या कारभारावर सामान्य नागरिक, खातेदार वॉच ठेवू शकतील. बँकेच्या कोणत्याही शाखेत कसल्याही प्रकारचा अपहार, धोरणबाह्य कामकाज व अन्य प्रकारचा कोणताही गैरकारभार होत असेल तर याची माहिती, तक्रार बँकेच्या सांगलीतील मुख्यालयात अथवा बँकेच्या मेलवर करता येणार आहे. या माहितीची खातरजमा करून यात तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचार्‍याकडून होत असलेला गैरकारभार किती रकमेचा व त्याचे स्वरूप काय आहे यावर माहिती देणार्‍यास एक हजार ते दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी व्हिसल ब्लोअर धोरण मंजूर केले आहे. या धोरणानुसार बँकेच्या कर्मचार्‍यांवर लक्ष राहणार आहे.
- शिवाजीराव वाघ, सीईओ, जिल्हा बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news