

बुधगाव : घाटगेनगर कुमठे येथे रस्त्याकडेला खापर खवल्या (फिपन्स ) हा साप आढळून आला. सर्पमित्र गजानन जाधव यांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. थंड हवेच्या ठिकाणी विशेषतः सह्याद्री पश्चिम घाट, महाबळेश्वर, आंबोली, कोकण परिसरात खापर खवल्या हा साप आढळून येतो आपल्याकडे फारसा दिसत नाही.
काळपट जांभळा रंग असून त्यावर पिवळे ठिपके असतात, निमुळते तोंड आणि चपटे शेपूट यामुळे या सापाला बोली भाषेत दुतोंड्या असेही म्हणतात. तो बिन विषारी असून एक ते दीड फूट इतकी लांबी असते. त्याची अतिशय संथ गती असून मातीत तोंड गाडून स्वतःचा बचाव करतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात जमिनीखाली रहात असून पावसाळ्यात भक्ष्याच्या शोधार्थ जमिनीवर दिसून येतो.