सांगली : येथील श्री राम मंदिर चौकात साथीदार ग्रुपतर्फे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजांनी चौक सजला होता. तरुणांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी श्री राम, हनुमान आणि श्री गणेशाची आरती करण्यात आली.
साथीदार ग्रुपतर्फे आयोजित या कार्यक्रमाने परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केले. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपचे नेते दिलीप सूर्यवंशी, महापौर धीरज सूर्यवंशी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती बानू जमादार, महापालिका माजी सभागृह नेत्या भारती दिगडे, दैनिक ‘पुढारी’चे शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, भाजपच्या मध्य मंडल सरचिटणीस ईशा साठे, नगरसेवक चेतन सूर्यवंशी, योगेश कापसे, पृथ्वीराज पाटील, नगरसेवक रवींद्र सदामते, दयानंद खोत, राजू पळसे, प्रशांत पाटील, वसीम शिकलगार प्रमुख उपस्थित होते. सोहळ्यास रामभक्तांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याहस्ते महापौर धीरज सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हरिपूर येथील पृथ्वीराज गायकवाड याचा दांडपट्टा कलेतील प्राविण्याबद्दल सत्कार करण्यात आला. साथीदार ग्रुपच्या माध्यमातून महापौर धीरज सूर्यवंशी यांनी रामनवमीचे आयोजन केले. धीरज सूर्यवंशी यांनी महापौर पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आदर्श कारकीर्द घडवावी, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष इनामदार यावेळी म्हणाले.