

सांगली : विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत तेजस मारुती सुपे (वय 20, रा. वाढा, ता. खेड, जि. पुणे) हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा युवक ठार झाला. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
तेजस हा सांगलीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टीफिशियल एंटेलिजल्स (एआय) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तेजस हा रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत झाल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, आशिष सावंत, अमीर नदाफ, शिवराज टाकळी आदींनी मदतकार्य केले. अपघात नेमका कसा झाला? याचा पोलिस तपास करत आहेत.