सांगलीत ‌‘अॅग्रीपंढरी‌’ची जय्यत तयारी

40 पिकांचे प्लॉटस्‌‍, साकारले शेतीचे आधुनिक रूप
Agri Pandhari exhibition
Agri Pandhari exhibition
Published on
Updated on

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या ‌‘पुढारी अॅग्रीपंढरी‌’ या भव्य पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विशेषतः पिकांचे लाईव्ह प्रदर्शन घडवणाऱ्या पीक प्रात्यक्षिक विभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 20 ते 23 फेबुवारी 2026 दरम्यान सांगलीत रंगणाऱ्या या कृषी प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांची आणि कृषी कंपन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती दै. ‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, ‌‘ऑर्बिट क्रॉप न्युट्रीएंट‌’ हे मुख्य प्रायोजक आहेत. या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष शेतात घेतलेली पिके. नोव्हेंबर महिन्यात जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर प्लास्टिक मल्चिंगसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून सर्व रोपांची लावण पूर्ण झाली असून, जोमदार वाढ झाली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत शेतकऱ्यांना 40 हून अधिक पिके पूर्ण वाढलेल्या आणि जोमदार स्थितीत पाहता येणार आहेत.

शेती क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि विविध कृषी कंपन्यांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची ही सांगलीतील सर्वात मोठी पर्वणी ठरणार आहे. अशाप्रकारचे प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिक बारामतीनंतर महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांगलीत राबवले जात आहे. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी पुरवठादार कंपन्या आणि प्रगतशील शेतकरी या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहेत. प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी कृषी कंपन्यांनी मोठी उत्सुकता दर्शवली आहे. स्टॉल विक्रीला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता, आता केवळ मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले आहेत. हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याने, उर्वरित स्टॉलसाठी व्यावसायिकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news