Sangli News : ‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ने दिला परिवर्तनासाठी आत्मविश्वास

शेतकऱ्यांची भावना; हाऊसफुल्ल गर्दीत प्रदर्शनाची सांगता
Sangli News
सांगली : पिकांची पाहणी करण्यासाठी नागरिकांचा ओघ असा कायम राहिला.
Published on
Updated on

सांगली : ‌‘आबा-आज्ज्यापासून तीच ती पारंपरिक शेती करत होतो. शेतीत नवीन प्रयोग होत आहेत. नवीन तंत्र, अत्याधुनिक मशिनरी, नवीन खते, नवीन बियाणे आले आहे, याची माहिती होतीच, पण हे सारं आपल्या शेतीत आणायचं धाडस होत नव्हतं. पण, ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’त आलो, इथले प्रात्यक्षिकांचे प्लॉट्‌‍स बघितले, साऱ्या स्टॉल्सना भेटी दिल्या, नवे तंत्र पाहिले आणि धाडस आलं. ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ने आम्हाला परिवर्तनासाठी खूप मोठा आत्मविश्वास दिला. धन्यवाद दैनिक पुढारी आणि धन्यवाद ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी..!‌’ अशी भावना अनेक युवा शेतकऱ्यांमधून व्यक्त झाली.

दै. ‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌‘पुढारी ॲग््राीपंढरी‌’ या प्रदर्शनाची सोमवारी सांगता झाली. ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्यूट्रिएंट्‌‍स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून अ हेवन हॉलिडेज्‌‍ हे ट्रॅव्हल पार्टनर होते. बी. जी. चितळे डेअरी आणि कन्हैया ॲग््राो हे सहप्रायोजक, तर सोनरूपम जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे गिफ्ट पार्टनर होते. प्रदर्शनास राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ यांचे सहकार्य लाभलेे.

पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवस प्रदर्शनात हाऊसफुल्ल गर्दी होती. अखेरच्या दिवशी सकाळपासून ते प्रदर्शन संपेपर्यंतही गर्दी तुडुंब होती. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरूनही शेकडो शेतकरी मित्रमंडळी कुटुंबासह प्रदर्शन पाहण्यासाठी येत होती. प्रदर्शनातील सारे स्टॉल्स हाऊसफुल्ल होते. स्टॉल्ससोबत प्रात्यक्षिकांच्या प्लॉटस्‌‍वरही गर्दी होती.

75 पेक्षा जास्त प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फुलांचे प्लॉट्‌‍स शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत होते. पिकांची, त्यासाठी वापरलेल्या तंत्रांची, औषधे आणि खतांची माहिती शेतकऱ्यांना मिळत होती. शेतात प्रत्यक्ष उभी पिके पाहून विक्रमी उत्पादनाचे ‌‘गुपित‌’ जाणून घेण्याची संधी यानिमित्तानं त्यांनी घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र तज्ज्ञांकडून थेट माहिती करून घेता आले. औषधे, दर्जेदार बी-बियाणे आणि अत्याधुनिक शेती अवजारांचे स्टॉल्स एकाच छताखाली असल्याने खूप मोठी सोय आणि संधी त्यांना मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news