Sangli News : 36 हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा

घरपट्टीचे 94 कोटी थकीत : आज 10 मालमत्ता होणार सील : बड्यांची नावे चौकात झळकणार
Sangli News |
Sangli News : 36 हजार मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसाPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महापालिकेने थकीत 94 कोटी रुपयांच्या घरपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. 50 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 2095 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या आहेत. 5 हजार रुपयांवरील थकबाकी असलेल्या 34 हजार 195 मालमत्ता धारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. बुधवारी 10 मालमत्ता सील होणार आहेत. बड्या थकबाकीदारांची नावे लवकरच चौकात आणि वृत्तपत्रांमध्ये झळकणार आहेत.

महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कराचे एकूण 94 कोटी रुपये थकीत आहेत. वेळोवेळी नोटिसा देऊनही थकबाकीदारांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील, सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे.

थकबाकी भरा, अन्यथा कारवाई : सत्यम गांधी

महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने नागरी सेवा आणि विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झालेली आहे. थकबाकीदार मिळकतधारकांनी त्वरित आपली थकबाकी रक्कम भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे.

मालमत्ता आजपासून सील : अश्विनी पाटील

थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता सील करण्याची कार्यवाही आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी 10 मालमत्ता सील करण्याचे नियोजन आहे. मालमत्ता सील, जप्तीची कार्यवाही सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त अश्विनी पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news