Sangli Accident : खड्ड्यांमुळे ब्रेक मारला आणि गंभीर जखमी झाला

उमदीजवळील अपघात; दुचाकीस पिकअप्‌ची मागून धडक
Sangli Accident News
खड्ड्यांमुळे ब्रेक मारला आणि गंभीर जखमी झाला
Published on
Updated on

जत : रस्त्यावर खड्डे असल्याने त्याने मोटरसायकलचा ब्रेक दाबला आणि पाठीमागून दुसऱ्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. खड्ड्यांच्या या स्थितीमुळे एक गंभीर जखमी झाला आणि दुसरा सहकारीही जखमी झाला. रस्त्यावरील खड्डे कसे जीवघेणे आहेत, याचे हे रोजचेच केवळ एक उदाहरण.

उमदी गावालगत ओढापात्राजवळील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअप्‌ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला एक किरकोळ जखमी झाला. अर्थातच दुचाकीचेही नुकसान झाले. हा अपघात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला. याबाबत सिद्धू परशुराम कोळी (३८, रा. सोनलगी, ता. जत) यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी कृष्णकुमार बाळासाहेब पाटील (२०, रा. उमदी) याच्यावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कोळी हे मित्राची मोटरसायकल (एमएच १० बी. क्यू ९९५२) घेऊन उमदी गावात किराणा बाजार व घरगुती साहित्य आणण्यासाठी जात होते. त्यावेळी पाटील मळा परिसरात त्यांचे परिचित मनोहर आण्णाराव पाटील (रा. उमदी) यांनी उमदीपर्यंत सोडण्याची विनंती केल्याने ते मोटरसायकलवर मागे बसले. रस्त्यावर खड्डे असल्याने कोळी यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला. त्याचवेळी मागून आलेल्या पिकअप्‌ जीप (एमएच १३ सी. यू ३४७८) च्या चालकाने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्‍या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कोळी गंभीर जखमी झाले, तर पाटील किरकोळ जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news