Sangli Robbery: सांगली येथील पोलिस अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास
Sangli Robbery: सांगली येथील पोलिस अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा
Published on
Updated on

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला. एकाच गल्लीतील तीन घरे फोडून सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन बाबर यांच्या घराचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसाचेच घर सुरक्षित नसल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाच ते सहाजणांच्या टोळीने माळवाडी भागाला लक्ष्य केले. सपोनि बाबर हे सांगलीत कार्यरत असल्याने, त्यांना घरी येण्यास उशीर होणार होता. आई-वडिलांची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी घराला कुलूप लावून चावी खिडकीत ठेवण्यास सांगितली होती व आई-वडील वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते.

बाबर कामानिमित्त येऊ शकले नाहीत, याचाच गैरफायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील ११ तोळे सोने, चांदी आणि रोख ७ हजार रुपये असा ऐवज लंपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news