Sangli News : पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचे काम संथगतीने

सांगलीत 5 वर्षांत केवळ 2500 जोडण्या; 35 हजार जणांची बसवली मीटर
Gas Pipeline
Gas PipelinePudhari
Published on
Updated on

सांगली : शहरातील पाईपद्वारे नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठ्याचे काम अनेक ठिकाणी प्रशासकीय दिरंगाई, आर्थिक अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे कासवगतीने सुरू आहे. आतापर्यंत शहरातील केवळ अडीच हजार ग्राहकांना पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरु असून, सुमारे 35 हजार जणांच्या घरी मीटर आणि गॅस पाईप बसवण्यात आली असली तरी त्यांना गॅसचा पुरवठा सुरु नाही.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासनाच्या संस्थेच्यावतीने सांगली जिल्ह्यात पाईपद्वारे घरोघरी गॅस पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर येथील दाभोळ-बंगळूर या मुख्य पाईपलाईनमधून कनेक्शन घेण्यात आले आहे. याचे कामकाज प्रत्यक्षात 2021 पासून प्रारंभ करण्यात आले असले तरी महामार्गाच्या निर्मितीमुळे हे काम सुरुवातीला रखडले आहे. त्यानंतर आतापर्यंत कुपवाड रोड, विजयनगर, कर्नाळ रोड, विश्रामबाग, शंभरफुटी, स्फूर्ती चौक, गव्हर्न्मेंट कॉलनी, रामकृष्ण सोसायटी आदी ठिकाणी अडीच हजार कुटुंबांना गॅसचा पुरवठा सुरु आहे. याच ठिकाणी व्यावसायिक कनेक्शनही देण्यात आले आहे.

याचबरोबर मुख्य बसस्थानक परिसर, रामनगर, हरिपूर, गावभाग, कोल्हापूर रोड, काही खणभाग, संजयनगर आदीसह मिरजेत 35 हजार ठिकाणी गॅसची मीटर आणि पाईप बसवली आहेत. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात गॅसचा पुरवठा सुरु केलेला नाही. कंत्राटदारांच्या मक्तेदारीमुळेही कामात विलंब झाला असून, पाईपलाईनचे जाळे वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवरच अवलंबून राहावे लागत आहे. कंपनीकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असून अनेक कारणामुळे महापालिकेच्या परवानगीअभावी हे काम संथगतीने सुरू आहे, अशी माहिती गॅस कंपनीकडून देण्यात आली.

गॅस कंपनीने नियम आणि अटींची पूर्तता करुन खड्डे काढून गॅस पुरवठा केला पाहिजे. अनेक ठिकाणी त्यांनी अर्धवट काम केल्याने पुढील त्यांचे काम थांबवण्यात आले आहे. रस्ते उकरणे, पाण्याची पाईप तोडणे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नियमांची पूर्तता केल्यास परवानगी देण्यात अडचणी नाहीत.
- स्मृती पाटील, उपायुक्त, महापालिका, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news