Sangli Crime : बचत प्रतिनिधीकडून सव्वालाखाचा अपहार

कोकरूड येथील उदय पतसंस्थेतील प्रकार
 Crime News
अपहार
Published on
Updated on

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथील श्री उदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या बचत प्रतिनिधीने ग्राहकांकडून गोळा केलेली १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम पतसंस्थेत जमा न करता त्याचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यात बचत प्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संस्थेचे शासकीय लेखापरीक्षक लक्ष्मण गणपती सुतार यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित कृष्णा आनंद सकटे (रा. चिंचोली, ता. शिराळा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कृष्णा सकटे हा उदय पतसंस्थेत बचत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे संस्थेचे ३० खातेदार रोजच्या बचतीचे पैसे जमा करत होते. सकटे याने सन २०१९ ते २०२१ या कालावधीत खातेदारांकडून गोळा केलेली १ लाख १९ हजार ४६५ रुपयांची रक्कम पतसंस्थेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला.

वार्षिक ऑडिटदरम्यान हा अपहार उघडकीस आल्यानंतर लेखापरीक्षकांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार माने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news