Sangli News : साठेबाजी करणाऱ्या पेट्रोल पंपांचा परवाना तत्काळ निलंबित करणार

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष; पेट्रोल पंपांची अचानक तपासणी
Sangli News
सांगली : डॉ. मैनाक घोष यांनी बुधवारी पेट्रोल पंपांची तपासणी केली.
Published on
Updated on

सांगली : ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या किंवा साठेबाजी करून चढ्या दराने इंधनाची विक्री करणाऱ्या पंपांचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिला. डॉ. घोष यांनी मंगळवारी रात्री विविध पेट्रोल पंपांना अचानक भेट देऊन तपासणी केली व सद्यस्थिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडित व सुरळीत इंधन पुरवठा सुरू राहण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पेट्रोल पंपांना अचानक भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष फुलूके, अन्नधान्य वितरण विभागाचे निरीक्षक राजू कदम उपस्थित होते. यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पंपधारकांचे प्रतिनिधी व सर्व सेल्स अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी, कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता पंपधारकांनी घ्यावी, इंधनाचा काळा बाजार किंवा साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दररोज जिल्ह्यातील इंधनाची एकूण आवक, विक्री आणि शिल्लक साठ्याचा अहवाल घ्यावा. पेट्रोलपंप धारकांनी मर्यादेपेक्षा जास्त (उदा. कॅन किंवा बॅरलमध्ये) इंधन न देता सर्वांना समान वाटप करावे, असे सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news