Sangli Electricity Theft : पेड येथे १ लाख ३८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस

वीज मीटरच्या इनकमिंग वायरशी छेडछाड करून महावितरण कंपनीची १ लाख ३८ हजार ३८९ रुपयांची वीजचोरी
Electricity theft
Electricity theftpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : वीज मीटरच्या इनकमिंग वायरशी छेडछाड करून महावितरण कंपनीची १ लाख ३८ हजार ३८९ रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी एका ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महावितरणचे अधिकारी स्वप्निल संजय सदामते (वय ३८, रा. विश्रामबाग) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तासगाव तालुक्यातील पेड येथील रहिवासी सुरेश तुकाराम शेंडगे असे गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुरेश शेंडगे यांनी जुलै २०२५ ते जून २०२६ या कालावधीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मीटरच्या इनकमिंग वायरमध्ये छेडछाड केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्ष वापरलेल्या विजेपेक्षा मीटरमध्ये कमी युनिटची नोंद व्हावी, या हेतूने त्यांनी ५,५६९ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला. यामुळे महावितरणचे १ लाख ३८ हजार ३८९ रुपये ७६ पैशांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुरेश शेंडगे यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक गायकवाड अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news