Sangli News : पांडुरंग इंगळे अपहरणप्रकरणी संशयित चौघांचा शोध सुरू

स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके रवाना
 Kidnapping
अपहरण file photo
Published on
Updated on

सांगली ः बुधगाव येथील पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केलेल्या चौघांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. संशयित समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले

पांडुरंग इंगळे यांच्या अपहरणाची तक्रार त्यांचा मुलगा अमर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. सभापती निवडीस इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे राजकीय पातळीवर या अपहरण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला. त्यात त्यांनी चौघांनी अपहरण करून गोवा येथे नेल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडे सोपवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news