Sangli Crime : विषारी द्रव प्राशन केलेल्या पलूसच्या दाम्पत्याचा मृत्यू

कर्जाच्या तगाद्यामुळे मानसिक तणाव; महिन्यातील दुसरी घटना
Sangli Crime News
विषारी द्रव प्राशन केलेल्या पलूसच्या दाम्पत्याचा मृत्यू
Published on
Updated on

पलूस : विषारी द्रव पिलेल्या दाम्पत्याचा उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला. संजय तात्यासो पाटील (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पाटील (४२, रा पलूस) अशी मृतांची नावे आहेत. कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून पाटील दाम्पत्याने जीवन संपविल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. अशा पद्धतीने दाम्पत्याने जीवन संपविण्याची महिन्यातील ही दुसरी घटना. १ सप्टेंबरला अशीच घटना घडली होती.

पाटील दाम्पत्याने २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांच्यावर सांगली व मिरज येथील रुग्णालयांत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. ६) दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही घटनांबाबत पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

मनीषा यांनी २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविले होते. तेथे ५ सप्टेंबर रोजी उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊ दिले होते. घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

संजय पाटील यांनाही २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात, तेेथून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले होते. त्यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी उपचार केले. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. ६ सप्टेंबर रोजी सकाळी घरी असताना संजय यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news