Sangli Poisoning Incident : पलूसमध्ये भावा-बहिणीचे विषप्राशन

जागेच्या वादातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कृत्य; शहरात खळबळ
 death
death Pudhari
Published on
Updated on

सांगली : जमिनीच्या वादातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून भाऊ आणि बहिणीने पलूस शहरातील भरचौकात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली.

सागर बबन सावंत आणि मेघा बबन सावंत (दोघे रा. आंधळी, ता. पलूस) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या भावाबहिणीची नावे आहेत. सामायिक जमिनीच्या वादातून समोरील व्यक्तींकडून आपल्याला वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सावंत कुटुंबीयांनी केला आहे. या जमिनीबाबत कोल्हापूर खंडपीठात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी पलूस पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सावंत कुटुंबीयांनी सांगली येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातही धाव घेतली होती. त्यानंतर पलूस पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती; तरीही मानसिक त्रासाला कंटाळून दोघांनी पलूसच्या मुख्य चौकात विषप्राशन केले.

घटनेनंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चौक परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पलूस पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news