Sangli Online Store Scam: ऑनलाइन स्टोअरच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक

विट्यातील एकास गंडा : १४ जणांवर गुन्हा
Online Store Scam
Online Store Scam
Published on
Updated on

विटा : ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचे आमिष दाखवून एका ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निरंजन शिशिर महाजन (वय ५०, रा. चिखली, जि. बुलढाणा, सध्या रा. संभाजीनगर, विटा) यांनी विटा पोलिस ठाण्यात १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील संभाजीनगर भागात राहणारे महाजन यांना एका संकेतस्थळाच्या (वेबसाइट) माध्यमातून ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचे आमिष दाखवले होते. त्याला बळी पडून महाजन यांनी २६ सप्टेंबर २०२५ ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संशयितांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर यूपीआय, आरटीजीएस आणि आयपीएसद्वारे वेळोवेळी एकूण १ कोटी ४० लाख २६ हजार ८३८ रुपये भरले. मात्र, रक्कम घेऊनही संशयितांनी ऑनलाइन स्टोअर सुरू न करता महाजन यांची फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी विटा न्यायालयात धाव घेतली. विटा येथील फौजदारी न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७५ (३) अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी 'स्टोअर-एनव्हीवायआय' (कॅलिफोर्निया, अमेरिका), कार्तिक राज गौतम, सिद्धार्थ पढीयार, यश स्टुडिओ, वसीम अहमद, अमनप्रीत सिंग, बलजिंदर सिंग, हिमांशु, रजनी, कृष्णा एक्सपर्टस, विश्वजीत सिंग, व्ही. ए. ट्रेडर, निखिल राणा, कश्मीर सिंग आणि साहिलप्रीत सिंग अशा एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फडतरे करत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news