Sangli Fraud : ऑनलाईन फसवणुकीची रक्कम आटपाडीतील एटीएममधून लंपास

अज्ञात सायबर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल
ATM News
ATM News
Published on
Updated on

आटपाडी : देशभरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून लाटलेली लाखो रुपयांची रक्कम आटपाडी येथील एका बँकेच्या एटीएममधून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच 'भारतीय न्याय संहिता' च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमोल पंडित पाटील (वय ३६) यांनी आटपाडी फिर्याद दिली आहे. २१ जुलै रोजी 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल' चे अवलोकन करत असताना, देशभरातील नागरिकांची फसवणूक करून जमा केलेली १ लाख २४ हजार ५०० रुपयांची रक्कम आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेच्या एटीएममधून काढल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक तपासात ही रक्कम सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक करून खात्यावर वर्ग केली आणि ती तातडीने आटपाडीतील एटीएममधून रोख स्वरूपात काढून घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंतरराज्यीय आर्थिक गैरव्यवहारामागे सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news