Sangli News| कांदा व्यापाऱ्यास बारा लाखांचा गंडा

तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Financial Fraud
Financial Fraud(file photo)
Published on: 
Updated on: 

​सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमधील एका कांदा-बटाटा कमिशन एजंटचा विश्वास संपादन करून तामिळनाडू येथील दोन व्यापाऱ्यांनी १२ लाख ७२ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शाहरुख बालेचाँद बागवान (वय ३३, रा. दैवज्ञ भवनमागे, पंकज फिल्मसमोर, पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महमंद अनस ए. (वय ५४, रा. वंदी पेठ, गुडलुर बझार, जि. द निलगिरी, तामिळनाडू) आणि यासर अरफात (रा. उटी, जि. द निलगिरी, तामिळनाडू) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान यांची कोल्हापूर रोडवरील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये 'शाहरुख बालेचाँद बागवान' या नावाने कांदा, बटाटा आणि लसूण कमिशन एजंटची फर्म आहे. संशयित महमंद अनस आणि यासर अरफात यांनी तामिळनाडूतील मेट्टुपालयम येथे 'लाना ट्रेडिंग' या नावाने मोठी कांदा-बटाटा विक्रीची फर्म असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर १५ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत संशयितांनी फिर्यादीच्या फर्मकडून १८ लाख २२ हजार ७५० रुपये किमतीचा एकूण ६८.८९९ टन कांदा खरेदी करून नेला. या व्यवहारापोटी फिर्यादीच्या बँक खात्यावर केवळ ५ लाख ५० हजार रुपये जमा केले; मात्र उर्वरित १२ लाख ७२ हजार ७५० रुपये न देता संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.