Sangli Accident : एसटी-जीपच्या अपघातात एक गंभीर, दोघे किरकोळ जखमी

दिघंची-आटपाडी रस्त्यावर घटना; जीपचा चक्काचूर
Sangli Accident News
एसटी-जीपच्या अपघातात एक गंभीर
Published on: 
Updated on: 

आटपाडी : दिघंची–आटपाडी रस्त्यावर जीप आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. ही घटना दिघंची महावितरण कार्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी घडली. या अपघातात जीपचालक रोहन संजय काळे (वय ३०) हा गंभीर जखमी झाला, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी (एमएच १४ एनई ७०४९) आणि जीप (एमएच ४७ बीएल ०४०८) यांची धडक झाली. जीप रस्त्यावर तीनवेळा पलटी झाली. या अपघातात जीपचा चक्काचूर झाला. जखमींना सांगलीत आणि एकाला आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी मदत केली. अपघातामुळे दिघंची–आटपाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.