Sangli Nursery Fire: सांगलीत नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू

शहरातील धामणी रस्त्यावर असणाऱ्या मयूर नर्सरीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला
Sangli Nursery Fire
Sangli Nursery Fire: सांगलीत नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यूPudhari
Published on
Updated on

सांगली : शहरातील धामणी रस्त्यावर असणाऱ्या मयूर नर्सरीला लागलेल्या आगीमध्ये होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे (वय 25, रा. कागवाड, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर मात्र संबंधित महिलेच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केले. आगीची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

शहरातील शंभरफुटी ते धामणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयूर नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये कर्नाटकातील एक दांपत्य कामास आहे. शुक्रवारी रात्री या नर्सरीला आग लागली. आगीमध्ये नर्सरीमध्ये असणाऱ्या पत्र्याच्या शेडसह नर्सरीमधील झाडे जळून खाक झाली. नर्सरीला आग लागताच महिलेच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केले. परंतु नर्सरीला लागलेल्या भीषण आगीमध्ये संबंधित महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

आगीची घटना निदर्शनास येताच नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. उत्तरीय तपासणीसाठी महिलचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

आगीनंतर पतीचे पलायन संशयास्पद

नर्सरीला लागलेल्या आगीनंतर घटनास्थळावरून संबंधित महिलेच्या पतीने पलायन केल्याचे घटनास्थळावरील नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पत्नी आगीत होरपळत असताना पतीने मात्र घटनास्थळावरून पलायन का केले? किंवा आगीच्या घटनेवेळी तो घरी होता की नाही, याबाबत विश्रामबाग पोलिसांकडून तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news